शेती हा देशाचा अविभाज्य घटक आहे. यामध्ये आता शेतकरी पुत्र व्यावसायिक शेतीचे शिक्षण घेऊन आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राज्यात कृषी शिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी स्पॉट अँडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने घेतल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रतिनिधी सुहास तरंगे, अजिंक्य सुरवसे यांच्यासह विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या पुण्यातील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणांनी शेतकरी पुत्रांनी परिसर दणाणून सोडला. तर जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.